संस्कार पब्लिक स्कुल 12 विज्ञान चे सुयश

कुरखेडा/राकेश चौहान प्र 

झालेल्या एच.एच. सी.परीक्षेच्या निकाल जाहीर झाला असून संस्कार पब्लिक स्कूल च्या विध्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे या कनिष्ठ महाविद्यालयाने ९७.४३टक्के निकाल निकाल घेत शिक्षण क्षेत्रात आपले पाऊल रोवले आहे. संस्कार पब्लिक स्कूल च्या विज्ञान शाखेत ३९ विद्यार्थी नि परीक्षा दिली होती त्यात ३८विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले असून कु हर्षदा परसराम नागीलवार हिने ७१टक्के गुण घेत प्रथम आली आहे. यशस्वी विध्यार्थांचे आ. ग्रा.वि. संस्थेचे कोषाध्यक्ष तथा शाळा शिक्षण समिती चे अध्यक्ष वामनराव फायेसाहेब, संस्था सचिव दोषहर फाये,सहसचिव प्रा नागेश्वर फाये,प्राचार्य देवेन्द्र फाये, तथा सर्व प्राध्यापकवृन्द कर्मचारी यांनी अभिनंदन केले