ठेकेदाराच्या चुकीमुळे शिवणी येथील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

 

मंगरुळपीर(फुलचंद भगत)-तालुक्यातील शिवणी येथील पुलाचे बांधकाम सुरु असुन ठेकेदाराच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे परिसरातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसला असुन शेतात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकर्‍यांच्या नुकसानीची माहीती मीळताच आमदार लखन मलिक,तहसिलदार किशोर बागडे आणी कृषी विभागातील अधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकर्‍यांना न्याय मिळन्यासाठी ऊपाययोजना करन्याची ग्वाही दिली.
केंद्र सरकारने सगळीकडे रस्त्याचे जाळे पसरविन्याचा चांगला हेतु जोपासला असुन वाशिम जिल्ह्यातही याअंतर्गत दृतगती मार्गाचे काम केले आहे.नदिनाल्यावर मोठमोठे पुल बांधुन वाहतुक सुरळीत कशी करता येईल याची काळजी घेतल्या जात आहे.परंतु मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड येथे सुरु असलेल्या पुलाच्या बांधकाम यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना ञासदायक ठरत आहे.चुकीच्या पध्दतीने पुल बांधुन साईडला मातीची भर टाकली त्यामुळे नुकत्याच अडान नदीला आलेल्या पुरामुळे पुलाजवळील साईडला पाणी घुसुन परिसरातील शेतात गेले.शेतामधे सर्वञ पुराचे पाणी घुसल्याने उभे पिक पान्यात गेले तर काहींचे पिके खरडुन गेलीत.आधीच कोरोणासारखी महामारी त्यात ठेकेदाराच्या चुकीच्या पुलबांधकामाचा शेतकर्‍यांना फटका यामुळे शेतकरी हवालदिल झाले असुन नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी केली आहे.या पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची माहीती मिळताच आमदार लखन मलिक,तहसिलदार किशोर बागडे,सबंधित ठेकेदार,इंजिनिअर आणी कृषी विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली.शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाने तात्काळ मदत द्यावी आणी सबंधित पुलाच्या कामाची चौकशी करावी असे आदेश आमदार लखन मलिक यांनी दिले आहेत.न्याय न मिळाल्यास सामुहिक आंदोलन करु असा इशारा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206