राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व हल्लेखोर व सुत्रधाराला त्वरीत अटक करण्यासाठी निवेदन

0
84

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
ज्या महामानवांनी तमाम भारतीयांना संविधान देऊन जगाला मानवतेचा संदेश दिला भारतीय भुममीपुत्रांना न्यायदिला. त्या महामानवाच्या राजगृह या वास्तूत जाऊन ०७जुलै २०२०ला धूडघुस घालणाऱ्या हल्लेखोर व त्यामागील सुत्रधारांचा निषेध करुन मानसिक विकृत हल्लेखोर व सुत्रधाराला् त्वरीत अटक करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रसारक मंडळ भामरागडच्या वतीने मानसिक विकृत हल्लेखोर व सुत्रधाराला
त्वरीत अटक करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रसारक मंडळ भामरागडच्या वतीने तहसीलदार सत्यनारायण सिलमवार ‌यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री व गृह मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
‌ महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री व मा. गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात अशी‌ विनंती करण्यात आली आहे कि, मुंबई स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे आंबेडकरी समाजाचे आदर्श स्थान आहे.संपूर्ण जग या वास्तुकडे आदर्श भावनेने पाहत असते.आंबेडकरी समाजाचे हे एक प्रेरणास्थान आहे.अशा प्रेरणास्थानावर मानसिक विकृतीच्या हल्लेखोरांनी हल्ला करून धुडगूस घातला. त्यामुळे तमाम आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तरी हल्लेखोर व त्यामागील सुत्रधारांना त्वरीत अटक करुन गुन्हा दाखल करावा व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे निवेदनाद्वारे कळविले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रसारक मंडळ भामरागडचे अध्यक्ष , श्रीकांत मोडक, उपाध्यक्ष लीलाधर कसारे, सचिव प्रा.युवराज निमगडे, सदस्य डॉ.सुरेश डोहणे, प्रा.पारिषनाथ झाडे,श्रीराम झोडे,प्रा.एन.डी.चतुर,सुरजागडे बांबू,कोमटी आरकी इत्यादींनी भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांना निवेदन सादर केले. तहसिलदार सिलमवार यांनी आजच त्वरीत सदर निवेदन मा.मुख्यमंत्री व या.गृहमंत्री महोदयांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.