जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच पुणे जिल्हा परिषद आणि बावडा लाखेवाडी गटातील सरपंच व ग्रामसेवकांची व्हिडिओ कॉन्फरन्स

 

निरा नरसिंहपुर दिनांक 17 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार, 

बावडा लाखेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या  अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या संकल्पनेतून प्रथमच इंदापूर तालुक्याच्या जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गटातील सर्व सरपंच व ग्रामसेवक आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषजी प्रसाद   यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद आयोजित करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी-जिल्हा परिषद सदस्य -सरपंच -ग्रामसेवक यांच्या मध्ये असा थेट संवाद झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी दिली.

अंकिता पाटील म्हणाल्या की,’  कोविड-19, ग्रामस्तरीय समिती, DRDA आवास योजना, महिला व बालकल्याण विभागाचे 15 व्या वित्त आयोगातून या निधीतून अंगणवाडी केंद्रासाठी पायाभूत सुविधा, अंतर्गत विकास कामे करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रलंबित विषय, मनरेगाची विकास कामे ,बांधकाम विभागाचे, जिल्हा विकास यंत्रणा, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग व इतर विषयांवर जवळपास 2 तास सकारात्मक चर्चा झाली व अनेक प्रलंबित विषय मार्गी लागले.’

कोरोना पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रलंबित विषय मार्गी लागत असल्याने अनेक सदस्य आणि ग्रामसेवकांनी समाधान मानले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुसंवाद साधणार असल्याने हा इंदापूर पॅटर्न सर्वत्र राबविला जाणार आहे.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160