ब्रह्मपुरी येथे शाळेत शिकणाऱ्या मुलाने स्वतःवर केरोसीन टाकून केली आत्महत्या

0
520

 

हर्ष साखरे सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

ब्रम्हपुरी(दि.14ऑक्टोबर ):-
मंगळवरला जवळपास सकाळी 9:00 वाजता ब्रम्हपुरी शहरात शाळकरी मुलीनी स्वतःवर केरोसीन ओतून जळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे..
मृतक मुलीचे नाव कु.नंदिनी भगवान तांबे वय वर्षे 16 असे असून ही ब्रम्हपुरी मध्ये आपल्या मावशीकडे शिक्षणासाठी राहत होती.तिने अकरावीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता. रोजच्या प्रमाणे मृतक मुलीची मावशी पिण्याच्या पाण्यासाठी जवळच्या हातपंपावर गेली होती.
घरी कुणीही नसलेले बघून कू. नंदिनी ने स्वतःवर केरोसीन ओतून जाळून घेतले. ही घटना माहीत होताच तिची मावशी व शेजारील घटनास्थळी पोहोचले असता उशीर झाला होता. व कू. नंदिनीचा जागीच मृत्यू पावली. कू. नंदिनी ही रा. भिवापूर जिल्हा. नागपूर ची रहिवाशी होती.
ही दुखःद बातमी कू. नंदिनी च्या परिवाराला धक्कादायक असून आत्महत्येचे नेमके कारण अजून कळले नाही. ही घटना ब्रम्हपुरी येथिल हनुमान नगर येथील आहे, पुढील तपास ब्रम्हपुरीच चे पुलिस करीत आहेत