काम न करता तालुक्याच्या विकासात अडसर येणाऱ्या संवर्ग विकास अधिकाऱ्याची चौकशी करून,तात्काळ निलंबित करून कडक कारवाई करावी. पत्रकार संघाने दिले निवेदन

0
430

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

कोरची :- कोरची पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हे कोणतेही कामे करीत नाहीत आपल्याच मर्जीने वागतात त्यांच्या वागण्यामुळे कोरची तालुक्याचा विकास खोळंबला आहे. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे.असे निवेदन पत्रकार संघाच्या वतीने दिले आहे.
संवर्ग विकास अधिकारी देविदास देवरे हे कोरची पंचायत समितीमध्ये 19 जुलै 2019 रोजी रुजू झाले. जुलै 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथून दररोज ये-जा करीत होते. त्यामुळे त्यांचा कोरची तालुक्यातील विकास कामाकडे कमी तर लाखांदूर निवासी जास्त लक्ष केंद्रीत राहायचा त्यामुळे या तालुक्यातील बरेच कामे झाले नाहीत. हागणदारी मुक्त गाव योजना ही कागदोपत्रीच आहे. गावातील नालेसफाई झाल्या नाहीत, शाळांमध्ये विद्युत पुरवठा नाही, 14 वित्त आयोगातून खरेदी केलेले साहित्य शाळेत धूळखात आहेत, आरोग्य यंत्रणा खूपच कमी झाली आहे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, आर्थिक व्यवहार कागदोपत्री आहे इत्यादी बाबतचे वृत्त वृत्तपत्रावर प्रकाशित झाले होते. तेव्हापासून देवरे हे मुख्यालयी राहत आहेत. ज्या वर्तमानपत्राच्या वार्ताहराने वृत्त प्रकाशित केले त्याच्याविरोधात संवर्ग विकास अधिकारी देवरे यांनी खोटी तक्रार पाठविले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना आहे त्यांची चौकशी केली असता देवरे हे दमदाटी करून सह्या घेतल्याचे सांगत आहेत. त्या तक्रारीत उल्लेख केलेल्या पंचायत समितीचे कार्य हे त्यांच्या आधीचे संवर्ग विकास अधिकारी वैरागडे यांच्या काळातील असून वैरागडे व तेथील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी पंतप्रधान आवास योजना, रमाबाई आवास योजना,बिरसा मुंडा आवास योजना इत्यादी च्या माध्यमातून घरकुल भरीव कार्य केल्यामुळे नागपूर विभागाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक कोरची पंचायत समितीला मिळाले परंतु दिलेल्या तक्रारीत देवरे हे त्या कामाचा श्रेय घेऊन वरिष्ठांकडे तक्रार केले आहे.
देवरे यांच्यासह येथील कर्मचारी ताळे बंदीच्या काळात विनापरवानगी बाहेरगावी गेले. कोरची येथून दोन किलोमीटर अंतरावरील मोहगाव येथे सिताफळाचे बियाचे रोपण केले त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या कोरोना संसर्ग विषयीच्या सूचनांचे पालन केले नाही, डिस्टन्स, मास्क , हात धुणे इत्यादी नियमाची पायमल्ली केली देवरे हे काम कमी व प्रसिद्धी जास्त करतात त्यामुळे देवरे यांची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करावे व त्यांच्यावर कडक कारवाई करावी . असे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री याना सादर केले आहे.