पवनी भाजपा तालुका अध्यक्षपदी मोहन सुरकर यांची निवड

 

प्रतिनिधी
राहुल उके/ बिंबीसार शाहारे

पवनी : भारतीय जनता पार्टी पवनी तालुका अध्यक्षपदी न. प. चे माजी नगराध्यक्ष मोहन सुरकर यांची निवड भाजपा जिल्हाध्यक्ष इंजि प्रदीपजी पडोळे यांनी नुकतीच नियुक्ती केली असून तसे नियुक्तीपत्र दिले आहे.
नवनियुक्त तालुका अध्यक्ष मोहन सुरकर यांनी आपल्या निवडीचे श्रेय विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, खासदार सुनील मेंढे, माजी राज्यमंत्री डॉ परिणयजी फूके, जिल्हाध्यक्ष इंजि प्रदीप पडोळे, संघटन मंत्री बाळाभाऊ अंजनकर, माजी आमदार चारणभाऊ वाघमारे, माजी आमदार रामचंद्र अवसरे, अनिलजी मेंढे, विलासभाऊ काटेखाये यांना दिले असून निवडीनंतर प्रशांत खोब्रागडे, अरविंद भालाधरे, अनुपजी ढोके, प्रकाश कुर्झेकर, राजेंद्र फुलबांधे, किशोर पंचभाई, हिरालाल वैद्य, अमोल उराडे, माधुरी नखाते, सीमाताई मोहिते, शरद देव्हाडे, मनोहर आकरे, दिनेश कोरे, मोहन घोगरे, प्रमोद मेंढे, मनोज वैरागडे, तिलक वैद्य, अमोल तलवारे, मॅचिंद्र हटवार, महादेव शिवरकर, संकुल शहारे, विलास गिरडकर, दत्तू मूनरतीवर, संदीप नंदरधने, किशोर जिभकाटे, लोकेश दडवे यांनी अभिनंदन केले.