मुदुकृष्णापुर गावातील मुख्य रस्त्यावर मुरूम ऐवजी माती टाकल्याने चिखलाचे साम्राज्य.. ग्रा.प.पेंटींपाका स्थानिक प्रशासनाचे प्रकार….

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:सिरोंचा तालुक्यातील ग्राम पंचायत पेंटींपाका अंतर्गत मुदुकृष्णापुर येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील श्री नरेश कज्जम यांच्याघरासमोर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असता गावकऱ्यांनी खड्डे बुझवण्याची मागणी स्थानिक ग्राम पंचायत कडे केले होते.ग्राम पंचायत स्थानिक प्रशासनाने मुरूम च्या ऐवजी माती टाकून खड्डे बुझवण्याचे काम केले आहेत.पावसाने तिथे चिकल निर्माण झाला.परिणामी येण्या-जाण्यास चिकलातून मार्ग काढावा लागत आहे.दुचाकी वाहन काढण्याकरिता जणु कसरतच करावी लागत आहे.आणि दुचाकी चिकलात फसण्याचे प्रकार घडत आहे.ग्राम पंचायत च्या वतीने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अवगमनास खुप अडचीनेचे कसरत करावी लागत आहे तसेच हा रस्ता चिकलाने भरून असल्याने पूर्णपणे रस्ता जाण्या- येण्यास बंद झालेला आहे करिता गावातील नागरिकांकडून स्थानिक प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत.या समस्यांकडे ग्राम पंचायत प्रशासनाने जातीने लक्ष देऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.