Home Breaking News सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्षपदी शीलवर्धन मुंजनकर यांची निवड

सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्षपदी शीलवर्धन मुंजनकर यांची निवड

141

प्रसेनजीत डोंगरे
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी,
8275290099,
गोंडपिपरी भारीप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन समितीची संपूर्ण जिल्हात कार्यकारिणी निवड प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष म्हणून शीलवर्धन सोहमप्रभू मुंजनकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
राज्यात भारिप बहुजन महासंघ प्रणित अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना न्याय, हक्काच्या मागणीची पूर्तता व्हावी,विद्यार्थ्यांच्या समस्या शासन दरबारी पोहोचवून समस्यांचे निराकरण करता यावे, हा उदात्त हेतू समोर ठेवून राज्यात सम्यक विद्यार्थी आंदोलन चळवळ उभी करण्यात आली. या चळवळीची नवीन कार्यकारिणी गठित करण्याचे कार्य नुकतेच सुरू करण्यात आले. या कार्यकारिणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष धीरज तेलंग यांच्या उपस्थितीत गोंडपिपरी तालुकाध्यक्षपदी शिलवर्धन सोहमप्रभू मुंजनकर यांची निवड करण्यात आली.
सदर निवडीबाबत अनिकेत दुर्गे, निश्चय उराडे, आशिष फुलझेले, मिलिंद रामटेके, यांच्यासह तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

Previous articleगडचिरोली जिल्हा सीमेवर वारंवार अप-डाऊन केल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Next articleराजगृहावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व हल्लेखोर व सुत्रधाराला त्वरीत अटक करण्यासाठी निवेदन