सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 12 वी चा निकाल 92.10%, संजिवणी राजपुरे प्रथम,पुनम मुळे द्वितीय तर भाग्यश्री बडे त्रुतिय

 

सिद्धेश्वर वामनराव कुलकर्णी कार्यकारी संपादक लातूर
मो. 7666462744
दखल न्युज/दखल न्युज भारत

चाकुर तालुक्यातील झरी (बु) येथे सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने झरी (बु) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 12 वी च्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली. विद्यालयाचा 12 वी चा निकाल 92.10%इतका लागला. विद्यालयाच्या कु.संजीवनी राजूरे 499 गुण घेऊन प्रथम. कु. पुनम मुळे 485 व्दितीय तर कु . भाग्यश्री बडे 479 यांनी त्रतिय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चंचल भारती विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री मा. बाळासाहेबजी जाधव आमदार बाबासाहेब पाटील, सचिव विक्रमसिंह दोडके पाटील, प्राचार्य श्रीमती आर. डी. देशपांडे , झरी गावचे सरपंच अजितराव खंदारे, धनगर समाज संघर्ष समिति जिल्हा अध्यक्ष तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दयानंद सुरवसे , व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले