विटभट्टीवर काम करणार्‍या महीलेच्या मुलीने मिळवले नेञदिपक यश महाविद्यालयातुन प्रथम येन्याचा सिमाने मिळवला मान पोलिस सेवेत जान्याचा सिमाचा मानस

129

 

वाशिम(फुलचंद भगत)-दिवसराञ विटभट्टीवर काम करणार्‍या महिलेने आपल्या मेहनतीच्या आणी संस्काराच्या जोरावर मुलीला शिक्षणाचे धडे दिले व याच आपल्या आईवडीलांची मेहनत आणी कष्ट डोळ्यासमोर ठेवून सिमा श्रृंगारे या विद्यार्थीनीने महाविद्यालया प्रथम येन्याचा मान पटकावला असुन ८०.३०% गुण मिळवुन नेञदिपक यश प्राप्त करुन यशाला गवसनी घातली आहे.
स्वतः काबाडकष्ट करुन आपल्या मुलांना संस्कारी पिढी घडविन्यासाठी धडपडनारे पालकांचे अनेक ऊदाहरणे आहेत त्यातच मंगरुळपीर येथील पंचशिल नगर मध्ये राहणारे आणी विट भट्टीवर दिवसराञ काम करणार्‍या महिलेने मुलीने भविष्यात आपल्या पायावर ऊभे राहुन मोठे अधिकारी बनन्याचे स्वप्न ऊराशी बाळगुन स्वतः कष्ट ऊपसले आणी मुलीला शिकवले.वडीलही मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा ऊदरनिर्वाह करतात पण डोळ्यात मुलींचे यश सदैव तेवत राहते.या कुटुंबात सिमा आणी विदीशा या दोनच कन्यारत्न परंतु मुलीला मुलाप्रमाणे मानुन तिच्या शिक्षणासाठी प्रेरणा आणी प्रोत्साहन देणारे हे कुटुंब.नुकत्याच लागलेल्या बारावीच्या परिक्षेच्या निकालामध्ये सिमा श्रृंगारे या विद्यार्थीनीने मंगरुळपीर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातुन ८०.३०% गुण घेवुन महाविद्यालयातुन प्रथम येन्याचा मान पटकावला आहे.महाविद्यालयाच्या प्रत्येक इवेंटमध्ये हिररीने भाग घेणार्‍या आणी नेहमी यश खेचुन आणनार्‍या सिमाने बारावीच्या परिक्षेत नेञदिपक यश मिळाल्याने तिच्या आईवडीलांच्या चेहर्‍यावर कमालीचे समाधान पाहावयास मिळाले व भविष्यात मोठी अधिकारी बनावे असा आशीर्वादही यावेळी दिला.सदैव हसतमुख आणी मनमिळावु स्वभावाच्या सिमाला महाविद्यालयातुनही शिक्षकवृंद आणी मिञमैञीनी यांचेकडुनही तोंडभरुन कौतुक करन्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देन्यात आल्या.काबाडकष्ट करुन मुलीला शिकवुन मोठं होन्याचं स्वप्न ऊरी बाळगनार्‍या या कुटुंबाची इतरांनीही प्रेरणा घेणे गरचेचे आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
9763007835