कोरोना संशयित रुग्ण आहेत गुन्हेगार नाहीत-देवेंद्र गोडबोले मौदा नगरपंचायत प्रशासनाची माणुसकी संपली

475

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

मौदा / नागपुर:१७ जुलै २०२०
दि. १६ जुलै २०२० रोजी मौदा शहरात corona +ve पेशन्ट भेटला. त्या पेशंट च्या घरातील सर्व व किरायादार कुटुंबातील सदस्यांना संस्थात्मक विलगीकरन केंद्रात नेण्या करिता मुख्याधिकारी व त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तोऱ्यात वागणूक होती असा आरोप शिवसेना नागपुर जिल्हा उपप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी केला आहे.
मौद्यातील त्या संशयित रुग्णांना घरी जेवण सुद्धा करू दिले नाही. त्यात लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे,जनता विद्यालय मौदा येथे नेण्यात आले,सर्व रूम बंद होत्या,२ तास सर्व संशयित बाहेर ताटकळत राहिले , त्या नंतर मला फोन आला मी तहसीलदार मौदा यांना सर्व प्रकार सांगितला त्या नंतर तहसीलदार यांनी लक्ष घालून शासकीय आय टी आय मधे संशयित यांना नेण्यात आले,नगरपंचायत मौदा चा कोणीही कर्मचारी तिथे उपस्थित नाही होते,पिण्याच्या पाण्याची सोय नाही,जेवणाची सोय नाही,तहसीलदार यांनी स्वतः पाणी बोलावले,ज्या पद्धतीने नगरपंचायत मुख्याधिकारी काम करत आहे, देश गुलाम आहे का, इंग्रज राजवट आहे का? हा प्रश्न मनात नक्की च येतो,या सर्व बाबी कडे जिल्हाधिकारी नागपूर यांनी लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे असेही गोडबोले म्हणाले. , covid 19 अत्यावश्यक काम सुरू असतांनी मुख्याधिकारी मुख्यालयी न राहता बाहेर गावी राहतात? हे नियमबाह्य़ आहे, या बाबत, नगरविकास मंत्री, पालकमंत्री नागपूर, मुख्यसचिव यांना देवेंद्र गोडबोले यांनी तक्रार केली आहे.