रेल्वे अपघातात अनोळखी तरूणाचा मृत्यू. ओळख पटविण्यासाठी परिसरातील जनतेला सिंदेवाही पोलिसांचे आवाहन.

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री. सुशीलकुमार सोनवाने हे पोलिस स्टॉफसह दिनांक- १६/७/२०२० चे रात्रोला गस्तीवर असतांना, त्यांना पोलिस कंट्रोल रुम चंद्रपूर येथून भ्रमनध्वनीवरून कळविण्यात आले की, राजोली सिंदेवाही‌ रेल्वे मार्गावर अपघात झाला आहे. तेव्हा ठिकाणावर सहकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन गेले असता, राजोली नवेगांव रेल्वे मार्गावर नवेगांव स्मशानभूमी जवळ एक अंदाजे ३५ वर्षे वयाचे तरूणाचा मृत्यू होऊन, संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्याचे जवळ काही आय.डी. पृफ असल्याबाबत खिशात शोधले असता, त्यांचेकडे कोणतेही आय. डी. पृफ आढळून आले नसल्याने त्याची ओळख अजूनही पटलेली नाही.
सदर मृतक हा गोऱ्या रंगाचा असून, त्याची उंची ५फुट ५ इंचा दरम्यान आहे. व बांधा मजबूत ‌असून, अंगात लाल, पांढऱ्या, निळ्या ‌रंगाचे डबे असलेला शर्ट व निळ्या रंगाचा जिन्स पॅंट लावलेला आहे. सदर इसमाचा रेल्वे अपघातात डाव्या पायाचा पंजा तुटलेला असून, मृताचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामिण रूग्णालय सिंदेवाही येथे हलविण्यात आले आहे. सदर तरूणाचे वर्णणावरून कुणाला मृतकाची ओळख पटल्यास तात्काळ सिंदेवाही पोलिस स्टेशनला संपर्क साधावा. अपघाताचा पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार सोनवाने हे करीत असल्याचे पोलीस सुत्रांनुसार कळले.