सिंदेवाहीत‌ कोविद-१९ चे स्वॅब तपासणे झाले सुरू, तालुक्यातील रुग्णांनी व जनतेनी याचा लाभ घ्यावा. नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन.

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

सिंदेवाही तालुक्यात बाहेरून येणाऱ्या संशयीत रुग्णांना व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, राज्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यांत कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने, त्याचा प्रसार रोखण्यासाठी, आणि सिंदेवाही तालुक्यातील जनतेला कोरोनामुक्त ठेवून त्याचा भागाकार करण्यासाठी मागासवर्गीय शासकीय मुलांचे वसतिगृह, सिंदेवाही येथे दिनांक- ९/७/२०२० पासुन, ग्रामिण रूग्णालयातील डॉक्टरांची एक टिम कार्यरत आहे. सदर ठिकाणी कोविद-१९ चे नमूने घेऊन स्वॅब तपासणीसाठी पाठविले जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कोविद सेंटर ला प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली असता, दिनांक ११/७/२०२० पर्यंत १४० रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मेडिकल कॉलेज, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले असून, ११६ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आणि त्या रुग्णांना घरी पाठवले आहे. सध्या २८ रुग्ण क्वॉरंटाईनमध्ये असल्याचे डॉ. सचिन कुमरे यांनी सांगितले.
कोविद केअर सेंटर चे टिममध्ये ग्रामिण रूग्णालय सिंदेवाही येथील डॉ. सचिन कुमरे, डॉ. नितीन भैसारे, श्वेता खातरकर, रामटेके अधि- परिचारिका, लोखंडे वाहनचालक आणि सि. सि. सेंटरवरील गार्ड कार्यरत असल्याचे सुत्रांनुसार कळले. तेव्हा सिंदेवाही तालुक्यातील समस्त रुग्ण तथा समस्त जनतेनी आपापले स्वॅब तपासणीसाठी अवश्य कोविद केअर सेंटरला भेट देऊन, कोविद-१९ बाबत अनभिज्ञ ‌न राहता खात्री करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाचे वतीने करण्यात आले आहे.

घरात राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा, गर्दित फिरणे कटाक्षाने टाळा, डॉक्टर, नर्स, पोलीस आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सांगितलेले म्हणने आवार्जून ऐका. आणि कोरोनाचा भागाकार करण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद !