CBSC १० वी चे परिक्षेत कुमारी अनुष्का बंडावार प्रथम. तिचेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव.

167

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी, दखल न्युज व दखल न्युज भारत.

सिंदेवाही- जिल्हा चंद्रपूर येथील *”देवयानी इंटरनॅशनल स्कुल सिंदेवाही”येथील सि.बि.एस.सि. दहाविचे परिक्षेत कुमारी अनुष्का विनय बंडावार हिने प्रथम क्रमांक पटकाविला असुन तिला ९३.६० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. ती सिंदेवाही येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विनय‌ वसंतराव बंडावार आणि स्त्रिरोग चिकीत्सक डॉ. श्वेतल विनय बंडावार यांची मुलगी आहे. कुमारी अनुष्का हिने प्रथम क्रमांक पटकावला असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील आणि शाळेचे प्राचार्य तसेच शिक्षक वृंद यांना दिले आहे.