दर्यापूरमधील दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह,त्यांचे दोन सहकारीही पॉझिटिव्ह, तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या 19 वर पोहचली

188

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)

दर्यापूर तालुक्यात आज एकाच दिवशी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या आता 19 वर जाऊन पोहचली आहे आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांत दर्यापूरतील दोन नामांकीत डॉक्टर असून दोन त्यांचे कंपाऊंडर आणि टाकळी येथील एक रुग्ण असे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत
पाच दिवसांपूर्वी तालुक्यातील शिंगणापूर येथील महिला दर्यापूरात उपचारासाठी आली होती येथे एका डॉक्टरकडे ती उपचार घेत होती परंतु प्रकृती ठीक न झाल्यामुळे ती महिला अमरावती येथे गेली त्या ठिकाणी सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यामुळे त्या महिलेच्या संपर्कातील दर्यापूरतील दोन डॉक्टर व त्यांचे दोन कंपाऊंडर सहकारी हे सामदा येथील कोविड सेंटरमध्ये स्वतः होम क्वारंटाईन झाले होते पाच दिवासानंतर या चारही जणांचे स्वाब घेऊन तपासणी करण्यात आली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे त्यांना अमरावती येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले
4 ते 5 दिवसापासून जे नागरिक या डॉक्टरांच्या संपर्कात आले असतील त्यांनी कसलीही माहिती लपवू नये तशी माहिती त्यांनी प्रशासनाला द्यावी