मोटरसायकलवरुन विना परवाना दारु विक्रीस नेणाऱ्या दोघांना पकडले, खल्लार पोलिसांची कारवाई

147

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
तालुक्यातील खल्लार पो स्टे हद्दीतील लांडी फाटा येथे आज 16 जुलै रोजी मोटरसायकलवरुन विनापरवाना दारु विक्रीस नेणाऱ्या दोघांना खल्लार पोलिसांनी दुपारी 12ते 12:30दरम्यान पकडले
मोचरडा येथील गोकुळ सुभाष सुलताने व मोहन महादेव गावंडे हे दोघे मोटरसायकल क्र एम एच 27,बीपी0793या गाडीने खल्लार कडून मोचरडा येथे विना परवाना देशी दारु विक्री करण्याकरीता घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली खल्लारचे ठाणेदार अभिजित अहिरराव यांच्या मार्गदर्शनात पो हे कॉ अशोक सावरकर पो कॉ शाकीर शेख हे लांडी फाटा जाऊन आडोशाला बसले मोटरसायकल वरुन गोकुळ सुलताने व मोहन गावंडे हे लांडी फाट्यावर येताच पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या नॉयलॉनच्या थैलीची झडती घेतली असता त्यात 10 नग देशी दारुच्या पावट्या आढळून आल्या व मोहन गावंडेच्या पॅन्टच्या दोन्ही खिशात चार पावट्या अश्या एकुण 14 पावट्या किंमत 840 रु आढळून आल्यात पंचासमक्ष पोलिसांनी 840रु च्या पावट्या दोन मोबाईल किंमत 3000रु व मोटरसायकल किंमत 30,000रु चा मुद्देमाल जप्त केला असून दोघांवर मुदाका 65 (ई)नुसार गुन्हा दाखल करुन तपासात घेतला