आदिवासी विद्यार्थी संघ सिरोंचा कडून जि.प.अध्यक्ष कंकडालवार व जि.प.उपाध्यक्ष पोरेटी यांच्या सत्कार

 

सिरोंचा…गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व जि.प.उपाध्यक्ष व शिक्षण,आरोग्य सभापती मनोहर पोरेटी हे बुधवारी सिरोंचा दौऱ्यावर पहिल्यांदाच आले असता या दोघांची आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचाचे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी स्थानिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार केले.

सिरोंचा पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागनिहाय आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे दोन्ही पदाधिकारी आले असता स्थानिक विश्रामगृहात आविस पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद संबंधित विविध समस्या त्यांच्यापुढे मांडले.
तद्नंतर आविसकडून दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या शाल व श्रीफळ देऊन भव्य करण्यात आले.यावेळी आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसुधा जनगम, जिल्हा परिषद सदस्या सरिता तैनेनी, पंचायत समिती सदस्या शकुंतला जोडे, सरिता सुधाकर पेद्दी,आविस जेष्ठ नेते मंदा शंकर, बाजार समिती संचालक आकुला मल्लिकार्जुन, आविस सल्लागार रवी सल्लम, नागराजू इंगीली, मारोती गणापुरपु,श्याम बेज्जनी,रवी सुलतान, शेख इस्माईल,ओंकार ताटीकोंडावार, नागेश पेद्दपल्ली, तिरुपती चिट्याला, वासू सपाट,सारली दुर्गम ,लक्ष्मण बोल्ले,संपत गोगुला सह आविसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.