पंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विद्यान महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मुलींनी बाजी मारली

 

प्रतिनिधी
राहुल उके

महागाव:- दि.१६ जुलै २०२०
आज नुकताच महाराष्ट्र राज्य मंडळाने १२ वीचा निकाल जाहीर केला त्यामध्ये पंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विद्यान महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. परीक्षेसाठी एकूण 65 विद्यार्थी विद्यान विभागाला बसले होते. त्यापैकी 15 विद्यार्थी प्राविण्य प्राप्त केला असुन 44 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 05 विद्यार्थी द्वितीय श्रेणीतउत्तीर्ण झाले आहेत. यामधे सिमरन गोबाडे 83.38 व नलिनी सुकारे हि पण 83.08 टक्के गुणांसह प्रथम तर टुनेश्वरी खंडाईत ही 82.30 तसेच भरत गायकवाड 82 टक्के गुण घेऊन द्वितीय आले आहेत. तसेच कु. युक्ता लंजे 80. 62 टक्के व साक्षी डोंगरे 80.15 टक्के घेऊन तिसर्‍या क्रमांकावर आले.
तसेच कला शाखेतील विद्यार्थ्यांचां निकाल 97 टक्के लागला आहे त्या मध्ये कु. रोहिणी डोंगरे 81.69 व जितेश मेश्राम 81.23 टक्के घेऊन प्रथम तर कु. भाग्यश्री राऊत 76.77 हि द्वितीय तर कु. चांदणी बावने 75.69 व दिक्षा नेवारे 75.08 टक्के घेऊन तिसर्‍या क्रमांकावर आले, यामध्ये प्राविण्य श्रेणी मध्ये 05 तर प्रथम श्रेणीत 60 तर द्वितीय श्रेणीत 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्री. वाय. एस. परशुरामकर सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील व शाळेतील गुरुजन वर्गांना दिले आहे.