श्री. साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडाचे घवघवीत यश

268

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा स्थित श्री. साईनाथ कनिष्ठ महाविद्यालाचा १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ९३.३३% इतका आहे. या परिक्षेसाठी एकूण ७५ विद्यार्थ्यी बसलेले होते. त्यापैकी ७० विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले. कु. महिमा प्रदीप गुंडरे हिचा प्रथम क्रमांक असून तिला ७४.१५% मिळाले. ब्रह्मदेव बारीकराव नैताम (७२.१५) द्वितीय, कु. मुस्कान मोहम्मद शेख (६८.७७) तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व गुणवंतांचे प्राचार्य सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.