नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डि.बी.जे.महाविद्यालय, चिपळूणचा बारावीचा ९३.८६टक्के निकाल ■ वाणिज्य शाखेत कु.सई दिनेश शिंदे, शास्त्र शाखेत कु.ईशानी दिपक जोशी , कला शाखेत कु.श्रुती शेखर तटकरे हिने प्रथम क्रमांक मिळविला. ■ वाणिज्यशाखा ९५.१६टक्के, शास्त्रशाखा ९७.४१टक्के, कलाशाखा ८५.९५टक्के असा शाखानिहाय निकाल लागलाl

0
129

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर

चिपळूण : डि.बी.जे. महाविद्यालयाच्या एकूण १०५९ विद्यार्थ्यांपैकी ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतील एकूण ४७६ विद्यार्थ्यांपैकी ४५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शास्त्र शाखेतील एकूण ३४८ विद्यार्थ्यांपैकी ३३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतील एकूण २३५ विद्यार्थ्यांपैकी २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखेपैकी ७४ विद्यार्थी विशेष प्राविण्य, १५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २१५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ११ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. शास्त्र शाखेपैकी ३४ विद्यार्थी विशेष प्राविण्य, १६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १४२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेपैकी १२ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत प्रथम कु.सई दिनेश शिंदे, द्वितीय कु. वैष्णवी सागर पालांडे, तृतीय कु.शिव सचिन गाडेकर, चौथा कु.रझील नुरमहंमद दळवी, पाचवा कु.श्रावणी प्रदिप भोबेकर यांनी यश मिळविले.
शास्त्र शाखेत प्रथम कु.ईशानी दिपक जोशी, द्वितीय कु.निधी संदिप साडविलकर, तृतीय कु.साहिल संजय शिंदे, चौथा कु.चिन्मयी प्रसाद भागवत व पाचवा कु.नुपूर सुरेश शिंदे यांनी यश मिळविले.
कला शाखेत प्रथम कु.श्रुती शेखर तटकरे, द्वितीय कु.संकेत नरेंद्र कडवईकर, तृतीय कु.श्रृती संजय कांबळे, चौथा कु.शर्वरी सुधाकर चव्हाण व पाचवा कु.प्रतिक प्रकाश बेर्डे यांनी यश मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थी वर्गाचे नवकोकण एज्युकेशन सोसायटी, चिपळूणचे अध्यक्ष बापूसाहेब भिडे, चेअरमन मंगेश उर्फ बाबूशेठ तांबे, व्हाईस चेअरमन अॅड.जीवन रेळेकर, सर्व उपाध्यक्ष, विश्वस्त, सेक्रेटरी,खजिनदार,नियामक समिती सदस्य, तसेच प्राचार्य श्रीकृष्ण बाळ, उपप्राचार्य सौ. बिरादार, पर्यवेक्षक श्री.तळप, सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

दखल न्यूज भारत