जवाहर नवोदय विद्यालयचा दहावीचा शंभर टक्के निकाल

123

 

प्रतिनिधी/बिंबिसार शहारे

अर्जुनी/मोर. दि.१६/०७/२०२०:
जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध जिल्हा गोंदिया येथील बीएसई बोर्ड दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे . या परिक्षेत विद्यालयातील एकूण 76 विद्यार्थी सहभागी झाले होते आणि सर्वच विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले.
त्यात आयुश शहारे यांनी 96.60टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला ,कुमारी चंचल खेतान हिने 95.60 टक्के गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक मिळविला ,भावेश रहांगडाले यानी 95.20 टक्के गुण प्राप्त करून तीसरा क्रमांक मिळवीला, कुमारी भाग्यश्री बोरकर ह्या विद्यार्थीनीनेे 94 .60 टक्के गुण प्राप्त करून चौथा क्रमांक तर कुमारी सुमेघा मुनेश्वर आणि प्रतिक राउत यांनी 94.40 टक्के गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांनी गणित विषयात 100 पैकी 100 ,दोन विद्यार्थ्यांनी सायन्स विषयात 100पैकी 100 गुण तर एका विद्यार्थ्यांनी मराठी विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले .
या उत्कृष्ट निकाला बद्धल विद्यालयाचे प्राचार्य एम एस बालवीर यांनी गणित शिक्षक पी.के. शाहू आणि आर.के.मोटघरे ,मराठी शिक्षक ए.एस. रामटेके आणि श्रीमती आर एस बलवीर ,नागसेन ताकसांडे सोशल सायन्स शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे सर्व विद्यार्थ्यांना तसेच विद्यालयाच्या पालकांना आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना प्राचार्य बलवीर यांनी शुभेच्छा दिल्या.