१५ कंत्राटी कामगारांना सवेतन महाजेनको मध्ये घेण्यासाठी कामगार संघटनेचे आंदोलन

599

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर : १६ जुलै २०२०
कोराडी नवीन पावर प्लांट ३× ६६० मेगावॉट प्रकल्पातील युनिट ८,९,१० मधील ए बी यु कन्स्ट्रक्शन कंपनी मधील १५ कामगारांना विना नोटीस देता कामावरून काढुन टाकले होते. या कामगारांना सवेतन विना अट कामावर घ्यावे याकरिता आज कोराडी नवीन पावर प्लांट च्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय मजदुर सेना नागपुर जिल्हा सरचिटणीस विजय पाटील, राष्ट्रिय मजदुर कांग्रेस नागपुर जिल्हा सचिव भीमराव बाजनघाटे, तसेच पावरफ्रंट संघटना कोराडी अध्यक्ष वैभव फंडे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आंदोलन केले. महाजेनको मला पगार करीत नाही असे कारण सांगून एबीयु कन्स्ट्रक्शन कंपनी चे भरत पटेल यांनी कोलमील मधील १५ कामगारांना विना नोटीस देता कामावरून काढुन टाकले होते. जोपर्यंत हे मजुर १० ट्रक माल भरत नाही तोपर्यंत मी कामावर घेणार नाही असे ठणकावून भरत पटेल यांनी कामगारांना कमी केले. कामगारांना लेखी हमी दिल्यावरही कामगारांना घेतले नाही त्यामुळे आज आपल्या मजुरांच्या हिताच्या मागणीसाठी महाजेनको व कंत्राटदार यांचे विरोधात नारेबाजी करीत आंदोलन केले.