भय्याजी पाटील भांडेकर कला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

118

 

मधुकर उंदिरवाडे
ग्रामीण प्रतिनिधी

कापसी दिनांक १६ जुलै २०२० आज नुकताच महाराष्ट्र राज्य मंडळाने १२ वीचा निकाल जाहीर केला त्यामध्ये भय्याजी पाटील भांडेकर कला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. परीक्षेसाठी एकूण ७१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन ३ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त केला असुन ३७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीतउत्तीर्ण झाले आहेत. यामधे कोमलदास बोदलकर ८०.३० टक्के गुणांसह प्रथम तर मधुर गुरनूले ही ७५.३८ टक्के गुण घेऊन द्वितीय आली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील व शाळेतील गुरुजन वर्गांना दिले आहे.