मोलकरणीच्या मुलीने बारावीत मिळविले दैदिप्यमान यश वडिलांचे छत्र हरविले,आई करते धुणेभांडी बारावीत ९०:१५ टक्के गुण मिळविले.

0
534

 

वाशिम(फुलचंद भगत) :शहरातील धृव चौक येथील रहिवासी व धुणेभांडी करणाऱ्या महिलेच्या साक्षी या मुलीने बिकट परिस्थितीवर मात करून इयत्ता बारावीत ९०:१५ टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश मिळविले आहे.
साक्षी नारायण भड हिने स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होती.
सुमारे पंधरा वर्षा पूर्वी पती नारायणराव भड यांच्या निधनानंतर आई उज्वलाताई हिने परिसरातील लोकांची धुणेभांडी करून साक्षी व लहान मुलगा ओम यांचा सांभाळ केला.घरची आर्थिक परिस्थिती दयनीय असताना हालअपेष्टा सहन करीत उज्वलाताईने मुलांना वडिलांची उणीव भासू न देता त्यांच्या मध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली.अगदी बालपणापासून तल्लख बुद्धिमान असलेल्या साक्षीला आईकडूनच शिक्षणाचे खरे बाळकडू मिळाले.साक्षीने सुद्धा इयत्ता बारावीत मध्ये घवघवीत यश मिळविण्याचे स्वप्न बाळगत स्वतःला अभ्यासात झोकून दिले होते.जिद्द व चिकाटीने अभ्यासात रमलेल्या साक्षी कडून कोणत्याही प्राध्यापकांनी तिच्या आर्थिक परिस्थितीची जाण असल्यामुळे तिची फी घेतली नाही हे उल्लेखनीय आहे.साक्षीने सुद्धा एकाग्रचित्त मन लावून अभ्यास केला आणि इयत्ता बारावीत आई सोबतच सहकार्य करणाऱ्याचे तसेच प्राध्यापकवृंदाचे स्वप्न साकार केले.साक्षीच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी सुभाषचंद बंग व डॉक्टर रोशन बंग पिता पुत्रांनी स्वीकारली आहे.

सीए व्हायचंय
वडिलांच्या निधनानंतर आईने इतरांची धुणेभांडी करुन मला शिक्षण दिले.आता यापुढे सीए मध्ये करियर करून उच्च शिक्षण घेऊन आईचे पुढचे स्वप्न साकारायचे आहे.इयत्ता बारावीत येथील प्रा.कमल अग्रवाल,प्रा.कपिल राठी,प्रा.नितीन पुरोहित,प्रा.गुलाटी यांचे आपणास मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
9763007835