Home गडचिरोली तेंदुपत्ता तोडाई व संकलनाची मजूरी द्या आदिवासी बांधवांची आर्त हाक

तेंदुपत्ता तोडाई व संकलनाची मजूरी द्या आदिवासी बांधवांची आर्त हाक

187

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम,ईरकडुम्मे,पल्ली,येचली व मडवेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या २८ गावांतील तेंदुपत्ता तोडाई व संकलनाची मजूरी पावसाळ्याला सुरुवात झाली तरी अजूनही मिळाली नाही.त्यामुळे तेंदुपत्ता तोडाईची व संकलनाची मजूरी द्या असी आर्त हाक आदीवासीबांधवांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
१५ जुलै २०२०ला पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडताना आदीवासी बांधवांनी सांगितले की,तेंदुपत्ता हंगाम मे २०२० मध्ये ग्रामसभेद्वारे ग्रामपंचायत मन्नेराजाराम, ईरकडुम्मे,पल्ली,
व मडवेली येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या २८ गावांनी तेंदुपत्ता कंत्राटदार यांचेशी ४००रुपये प्रतिशेकडा व रॉयल्टी ४००रुपये प्रतिशेकडा प्रमाणे दर ठरवून करारनामा केला.यावर्षी कोविड-१९महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र टाळेबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली.त्यामुळे तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया पार पाडणे शक्य झाले नाही.ग्रामसभांनी परस्पर स्वतः ठरवून कंत्राटदाराशी करारनामा करून घेतला. त्यानूसार पाच ग्रामपंचायती अंतर्गत २८ गावांनी तेंदुपत्ता तोडाई करून संकलन केले.यामध्ये ग्रा.पं.मन्नेराजाराम-१२,३२,०००पुडा,ग्रा.पं.ईरकडुम्मे-१८,५७,८४०पुडा,ग्रा.पं.पल्ली-१२,९२,६२०पुडा,ग्रा.पं.येचली-०७,०६,०००पुडा व ग्रा.पं.माडवेलीअंतर्गत १०,८३,८१०पुडा,असे एकूण ६१,७२,२७०पुडा तेंदुपत्ता तोडाई व संकलन करण्यात आले.कंत्राटदारांनी बोदभराई करून सर्वच तेंदुपत्ता घेऊन गेला.मात्र २८ गावांतील तेंदुपत्ता तोडाई करून संकलन करणाऱ्या नागरिकांना त्यांची रक्कम अजूनही मिळालेली नाही.तद्वतच फडीमुन्शी,मदतनिस,बोदभराई,पाणी मारणे,पलटाई इत्यादी कामांची मजूरी सुद्धा मिळालेली नाही.
तेंदुपत्ता हंगाम हा येथील बहुसंख्य आदीवासी व इतरही नागरिकांसाठी आनंदाची आर्थिक पर्वणीच असते.संपूर्ण वर्षांचा आर्थिक बजेट तेंदुपत्ता हंगामावरच अवलंबून असते.येथील लोकांचा मुख्य उपजिविकेचा साधन म्हणजे तेंदुपत्ता संकलन करुन विक्री करणे हाच आहे.याच पैशातून लोकांचे घर चालते.मुलांचे शिक्षण,औषधी,कपडेलत्ते, शेतीसाठी लागणारे बि-बियाणे, अवजारे व खत इत्यादींसाठी याच पैशावर अवलंबून राहावे लागते.मात्र यावर्षी पावसाळा सुरू झाला तरी तेंदुपत्ता तोडाई व संकलनाचे पैसे अजूनही मिळाले नसल्याने येथील आदिवासी चिंतेत आहे.आता शेती कशी करायची याच विवंचनेत असतांनाच कुटुंब चालविण्याची चिंताही त्यांना लागली आहे.कोरोना महामारी मुळे रोजगारही उपलब्ध नाही, त्यामुळे जीवन कसे जगावे?असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
तेंदुपत्ता संकलनाचे पैसे मिळावे यासाठी २३ जून २०२०ला मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांनाही निवेदन दिले आहे.मात्र अजूनपर्यंत कार्यवाही झाली नाही.त्यामुळे शासन-प्रशासनाने याकडे लक्ष घालून आमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्वरीत तेंदुपत्ता संकलनाची रक्कम मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आर्त हाक पत्रकारपरिषदेत आदिवासींनी दिली आहे. सदर पत्रकारपरिषदेला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कृत सिताराम मडावी,माजी जि.प.समाजकल्याण सभापती इंदरशाह मडावी,मदन वेलादी,लक्ष्मन मडावी,बापु नागपूरकर,संजू येजूलवार व पाचही ग्रामपंचायती अंतर्गत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous articleदखल न्युज चा दणका बेज्जुरपली पुला वरील कामाला अखेर सुरुवात …
Next articleवणीत आणखी एक पुरुष निघाला पाझिटिव्ह