मजुरांचे वेतन त्वरीत अदा करा नितीन गोहणे यांची मागणी

0
99

सावली(सुधाकर दुधे)
व्याहड खुर्द तालुका सावली येथील फडरोप वाटीका कृषी चिकित्सा लयात काम करणाऱ्या मजुरांचे गेल्या तेरा महिन्यापासून वेतन न मिडल्यामुळे सदर मजुरांवर उपासमारीची पाळी आलेली आहे सदर मजुरांचे वेतन तत्काळ देण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नितीन गोहणे यांनी राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पूर्वसन तथा चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की तालुका फडरोप वाटिका व्याहड खुर्द येथे रोजदारीवर मजूर काम करतात सदर मजूर झाडांना पाणी देणे,झाडांचे संगोपन करणे, नवनव्या झाडांची निर्मिती करणे, इ कामे करतात मात्र कामे करूनही सदर मजुरांना गेल्या तेरा महिन्यापासून वेतन मिळाले नाही त्यामुळे सदर मजुरांवर उपासमारीची पाळी आलेली आहे काम करूनही वेतन न मिळाल्याने जगावे कसे असा प्रश्न मजुरपुळे निर्माण झाला आहे
याबाबतची व्यथा मजुरांनी तालुका काँग्रेस चे सरचिटणीस नितीन गोहणे यांचेकळे कथन केली सदर प्रकरणाची माहिती राज्याचे लोकप्रिय मंत्री माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्याकळे निवेदनाद्वारे केली असता राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचेशी प्रत्यक्ष भ्रमण धवणीवर संपर्क करून त्वरीत मजुरांचे वेतन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे मजूरांनी आनंद व्यक्त केला आहे