दखल न्युज चा दणका बेज्जुरपली पुला वरील कामाला अखेर सुरुवात …

 

प्रतिनिधी /जगदीश वेन्नम,रमेश बामनकर

गुड्डीगुडम:सिरोंचा तालुक्यातील बेज्जूरपली गावातील मंजुर पुलाचा काम अपूर्ण होता.त्यामुळे बेज्जूरपली गाव वासीयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.व पुल काम सुरू असताना बाजुने जे अवगमनास लहान पुल बांधले गेले होते ते पुल पहिल्या पावसाने वाहून गेल्यामुळे आणि पुलाचे काम निकृष्ट व अपूर्ण पुल बांधकाम ठेवल्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाही करण्याची मागणी त्या परिसरातील जनतेकडून केली होती. आणि दखल न्युज पोर्टलवर बातमी झळकताच संबंधित कंत्राटदारांनी बेज्जूरपली अखेर पुलाचे कामाला दि.15 जुलै रोजी सुरुवात केली आहे.
सदर पुल झाल्यास बेज्जूरपली परिसरातील अनेक गावांचा संपर्क पावसाळ्यात तालुका, जिल्ह्याशी जुडून राहतो अन्यथा पावसाळ्यात संपर्क तुटतो करिता बेज्जूरपली पुल अति महत्वाचे असून पुल बांधकाम कासवगतीने न करता लवकरात लवकर करावी लागणार आहे.बेज्जूरपली हे गाव अति दुर्गम, अविकसित व अतिसंवेदनशील असून पुल बांधकाम झाल्यास या परिसराचे विकास होण्यास चालना मिळेल.