Home शैक्षणिक भिवंडी तालुक्यातील आॅल सेंट्स हायस्कुलचे सुयश

भिवंडी तालुक्यातील आॅल सेंट्स हायस्कुलचे सुयश

433

 

दिलीप अहिनवे
मुलुंड मुंबई उपनगर प्रतिनिधी
दखल न्युज भारत
मो. 9323548658

भिवंडी, दि. १६ : आॅल सेंट्स हायस्कूल ही भिवंडी तालुक्यातील नामांकित शाळा आहे. पिसे डॅम रोडवर प्रशस्त जागेत ही शाळा वसलेली आहे. शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा आहेत. प्रशस्त वाहनतळ, २०० मीटरचा सिंथेटिक रनिंग ट्रॅक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान, भव्य क्रिकेटचे मैदान, अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल, स्केटींग ग्राऊंड, भव्य सभागृह तसेच सुंदर हिरवीगार गार्डन आदी उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध आहेत. क्रीडा क्षेत्रात शाळा अग्रेसर आहे. अभ्यासात देखील शाळेची प्रगती उल्लेखनीय आहे.

नुकताच सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. रोहीत राठोड या विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. दरवर्षी शाळेचा निकाल वाखाणण्याजोगा असतो.

कुणाल चौधरी ९७.८, सोनल पाटील ९७.४, जीवन विरवडेकर ९७.४, झरा जुल्फिकार ९७.२, व इला गोरे ९७.० टक्के गुण मिळवून अव्वल ठरले.

शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक मुलांना योग्य प्रकारे दिशा देत असल्यामुळे दरवर्षी शाळेचा निकाल उत्कृष्ट लागतो. शाळेचे २१ विद्यार्थी ९५.० ते ९८.०, ३७ विद्यार्थी ९०.० ते ९५.० तसेच जवळपास १०० विद्यार्थ्यांनी ७५.० ते ९०.० गुण मिळवून यशस्वी झाले.

मयुर विजय डुंबरे या विद्यार्थ्याने ९४.८० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. शाळेतील मुलांच्या उत्तुंग कामगिरीमुळे पालकवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous article सिंदेवाहीच्या सिधान्त लोखंडेचा ” बामसेफ “तर्फे सत्कार !  10 विच्या ‘सीबिएससी परिक्षेत मिळविले प्राविण्य
Next articleदखल न्युज चा दणका बेज्जुरपली पुला वरील कामाला अखेर सुरुवात …