सिंदेवाहीच्या सिधान्त लोखंडेचा ” बामसेफ “तर्फे सत्कार !  10 विच्या ‘सीबिएससी परिक्षेत मिळविले प्राविण्य

प्रतिनिधी/अमान कुरेशी
सिंदेवाही – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ,नवी दिल्ली मार्फत 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या सि .बि .एस .सि परिक्षेत सिंदेवाहीचा सिधाण्त विजयानंद लोखंडे ह्याने नुकत्याच जाहीर करन्यात आलेल्या निकालात विशेष प्राविण्य मिळविले आहे .

त्याच्या या नेत्रदीपक कामगिरी बद्दल बामसेफ सिंदेवाही शाखा जिल्हा चंद्रपूर वतीने बामसेफ जिल्हा संयोजक इंजि.चेतन वानखेडे व तालुका संयोजक शिल्पाल ताम्बागडे यांचे मार्गदर्शनाखालील गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन नुकताच सत्कार करन्यात आला .
यावेळी बामसेफ सिंदेवाही चे मिडिया प्रभारी शिक्षणतज्ञ प्रा .भारत मेश्राम व सदस्य सर्वश्री प्रा .जगदिश सेमस्कर , ईश्वर चहान्दे ,अनिल डांगे ,विजय घडसे व सुरेश खोब्रागडे आदी उपस्थित होते .

चिं .सिधान्त हा विश्वज्योति स्कुल तलोधी बाळापूर येथील विध्यार्थी असून त्याला 85 टक्के गुण मिळाले आहेत .सिधान्त चे वडील हे जिल्हा परिषद शाळेत अध्यापक असून विध्यार्थीप्रिय व्यक्तीमत्व राहिले आहेत .
सिधान्त ने आपल्या यशाचे श्रेय वर्गशिक्षिका,आईवडील आणि शाळेच्या प्राचार्या सिस्टर रोजबिन आदींना दिले आहे .