बारावीचा आॕनलाईन निकाल जाहिर ! ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालूका अव्वल!

मुरबाड दि.16(सुभाष जाधव) कोरोना संकटात मार्च २०२० मधे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या मधे यंदा ठाणे जिल्ह्ंयात मुरबाड तालुक्याने बाजी मारली आहे. तालुक्याचा एकूण निकाल 92.83%लागला आहे.
तर डोंगरन्हावे विभाग हायस्कूल डोंगरन्हावे या शाळेचा निकाल १००% टक्के लागलाय तर शारदा विद्यालय टोकावडे यांचा ९९.२५ इतका लागला असून विद्यामंदिर हायस्कूल शिवळे ९६.८२ लागला आहे तर न्यू इंग्लीश स्कूल मुरबाड ९०.९९ इतका लागला , कुडवली जुनियर कॉलेज-९०%, असोले हायस्कूल विभाग-८१%५७, तलावली आश्रम शाळा-९७%७७, म्हसा हायस्कूल-७१%४२, जनता विद्यालय धसई-९६%४०.तर मुरबाड न्यू इंग्लिश स्कूल आर्ट्समधून- नार्वेकर साक्षी-७६%३०, द्वितीय क्रमांक ढोले दिपाली-७३%३८, भोसले ओमकार बोस्टे ओमकार-७३%०७ तसेच सायन्स मधून प्रथम क्रमांक पठारे कोमल-८८%३०, द्वितीय क्रमांक-शेकाटे अक्षय-८६%७६, तृतीय क्रमांक-धुमाळ भाविका-८३%५३,तर विद्या मंदिर हायस्कूल शिवले मधून -आर्ट्स-प्रथम क्रमांक-आरती खाटेघरे-८६%३०, द्वितीय क्रमांक-शेलवले अमृता-८५%८४, सायन्स शिवले-विशे जयदीप-८२%४६, द्वितीय क्रमांक बांगर श्वेता-८१%५३, तृतीय क्रमांक -मुरबाडे रोहित -७९%२३, टोकावडे विद्यालयाची जोत्सना भांगरथ ७९.६९ %गुण मिळवुन शाळेत प्रथम आले तर धसई विद्यालयाची वैजयंती घोलप ७७% गुण मिळवुन प्रथम आली आहे. तसेच विद्या मंदिर हायस्कूल शिवले मधून आरती खाटेघरे हिने ८६%३० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे सदर आरती ही हे.भ.प. तालुक्यात कीर्तन सेवा करत आहे त्यामुळे त्याचे संपूर्ण मुरुड तालुक्यात अभिनंदन होत आहे.