डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आरमोरी चा निकाल 100%

207

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

आरमोरी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आरमोरी चा निकाल शंभर टक्के लागला आहे. महाविद्यालयाने या वर्षीही यशाची परंपरा कायम राखली. या महाविद्यालयातून एकूण 61 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणी मध्ये तीन विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून कुमारी प्रेरणा फकीर दास मेश्राम हिने 85. 0 6 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला ज्ञान रत्न देवराव सहारे याने 80.46% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला तर ज्ञानदीप देवराव सहारे याने 78.66% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष माननीय मदन रावजी मेश्राम सचिव प्रशांत जी मेश्राम मुख्याध्यापक व्ही जी शेंडे तसेच प्राध्यापक वृंद यांनी केले आहे.