किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथील निकाल 97%

142

 

अश्विन बोदेले
ग्रामीण प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

वडधा :- वडधा येथील स्थानिक किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेत 97 टक्के निकाल लागलेला आहे.
वडधा येथील किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 66 विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामध्ये प्रथम श्रेणीत 4 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 51 विद्यार्थी, तर तृतीय श्रेणीत 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये उर्मिला कोटगले या विद्यार्थीनीने 70 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला आहे. तर कोमल बरडे या विद्यार्थिनीने 67 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला, आहे तर बादल वाघाडे याने 64 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.
महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने तसेच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.