जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी चा निकाल 100 टक्के कला शाखें तुन मेघा जूनघरे तर विज्ञान शाखेत क्षितिज माहुरे प्रथम

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यास आलेल्या फेब्रुवारी -2020 इयत्ता 12 वीचा निकाल नुकताच आँनलाईन घोषित करण्यात आला. त्यात जनता कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुसचा विज्ञान विभागाचा 100 टक्के , कला विभाग 92.47 टक्के तर एमसीव्हीसी विभागाचा निकाल 60.60 टक्के लागला आहे.
कला विभागातून कु. मेघा विलास जुनघरे हीने 83.38 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला , व्दितीय क्रमांक कु. पूजा भारत पचारे हिने 83.31 टक्के गुण घेऊन पटकावला तर तृतीय क्रमांक कु.सुप्रिया किशोर उराडे हिने 77 टक्के गुण घेऊन पटकावला. विज्ञान विभागातून प्रथम क्रमांक क्षितीज संजय माहुरे याने 80.92 टक्के गुण , व्दितीय क्रमांक प्रणय थामदेव बोकडे 79.23 टक्के गुण तर तृतीय क्रमांक श्रुती अविनाश डोंगे हिने 78.92 टक्के गुण , तर फाल्गुनेश्वर सुरेंद्र बोबडे याने 78.62 टक्के गुण प्राप्त करुन पटकावला .
याशिवाय विज्ञान विभागाचे 31 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त तर कला विभागाचे 20 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत. यशस्वी विद्यार्थी यांचे संस्था सचिव प्राचार्य डाँ. अशोक जीवतोडे, अध्यक्ष डाँ. प्रतिभा जीवतोडे, जनता कनिष्ठ महाविद्यालय घुग्घुसचे प्राचार्य डाँ. विजय आर. हेलवटे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनि आपल्या यशाचे श्रेय आपले शिक्षक वृन्द व आई वडिलांना दिले आहे.