जिल्हयात १८ जणांची कोरोनावर मात, आत्तापर्यंत १०८ कोरोनामुक्त तर सक्रिय उरले 96 रूग्ण

153

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हयातील १८ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून सूट्टी देण्यात आली. यामुळे जिल्हयातील सक्रिय रूग्ण संख्या ९६ राहिली. आत्तापर्यंत १०८ रूग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.
दवाखान्यातून बऱ्या झालेल्या रूग्णांना घरी सोडते वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किनलाके, सहा.अधिसेवक शंकर तोगरे यांनी कोरोनामुक्त व्यक्तींना विलगीकरण सूचना व साहित्य वाटप केले.
▪️जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – १०८
▪️सद्या सक्रिय कोरोना बाधित – ९६
▪️मृत्यू -०१
▪️एकुण बाधित – २०४

*जिल्हयातील तालुकानिहाय कोरोना बाधित व कोरोनामुक्त*
(आकडेवारी क्रम – एकुण बाधित रूग्ण-बरे झालेले रूग्ण-सद्या सक्रिय कोरोना बाधित)

१) गडचिरोली – ८९-३५-५४
२) आरमोरी – ६-५-१
३) वडसा – १०-६-४
४) कुरखेडा – २५-१०-१५
५) कोरची – १-१-०
६) धानोरा – १४-११-३
७) चामोर्शी – ११-९-२
८) मूलचेरा –११-७-४
९) अहेरी – १४-८-६
१०) सिरोंचा –७-२-४(१ मृत्यू)
११) एटापल्ली – १२-११-१
१२) भामरागड –४-३-१

एकुण जिल्हा – २०४-१०८-९५(१ मृत्यू)

(जिल्हयाबाहेरील रूग्ण– ५१, पैकी डिस्चार्ज –८ तर सक्रिय-४३, यासह एकूण रूग्ण संख्या – २५५)