बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आमदार भास्करराव जाधव यांनी केले अभिनंदन

100

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण : आज लागलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात पुन्हा एकदा कोकणातील मुले हुशार ठरली आहेत, यात रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांनीही चांगली टक्केवारी मिळवत यश संपादन केले आहे.
१२वीच्या परीक्षेत कोकणाने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सलग ९व्या वेळी कोकण परीक्षा मंडळ संपूर्ण राज्यात अव्वल ठरले आहे. कोकणचा हा बहुमान कायम राखणाऱ्या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री गुहागरचे लोकप्रिय आमदार भास्करराव जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. मुलांच्या पुढील शैक्षणिक वर्षांसाठी शासनदरबारी लागणारे परिपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन आपल्या वतीने केले जाईल असे शुभेच्छा देतांना आ.जाधव म्हणाले,