महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा चिमूर द्वारा पत्रकारांना रेन कोटचे वाटप… — पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे,पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे,उपविभागीय अभियंता एस.यु.शेंडे,चिमूर तालुका अध्यक्ष केवलसींग जुनी यांची उपस्थिती..

0
216

दामोधर रामटेके
कार्यकारी संपादक
पावसाळ्याचा ऋतू लक्षात घेता,पत्रकाऱ्यांच्या सुरक्षा दृष्टिकोनातून,”महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा चिमूर,”द्वारे,पत्रकारांना रेन कोटचे वाटप काल आणि आज करण्यात आले.
रेन कोटचे वाटप करताना, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे,पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील बोकडे,लघू पाटबंधारे व जलसंधारण खात्याचे उपविभागीय अभियंता एस.यु.शेंडे,चिमूर तालुका अध्यक्ष केवलसींग जुनी,तालुका सरचिटणीस डॉ.कृष्णकुमार टोंगे, सहसंघटक उपक्षम रामटेके,उपाध्यक्ष दामोधर रामटेके,प्रशिध्दी प्रमुख सुरज नरुले,उपाध्यक्ष प्रमोद राऊत,संघटक विलास मोहिनकर,कोषाध्यक्ष सुभाष रामटेके,आदी उपस्थित होते.