शहरातील सोम फोटो कलर लॅबला आग, आ. किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

0
154

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
शहरातील जटपूरा गेट जवळ असलेल्या सोम कलर लॅबला अचाणक आग लागल्याची घटणा आज पहाटेच्या सुमार घडली असून घटणेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटणास्थळाला भेट देत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आदेश दिलेत. तसेच आगी मागचे कारण शोधण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस विभागाला केल्यात.
जटपूरा गेट समोर सोम फोटो कलर लॅब आहे. आज पहाटेच्या सुमारास या लॅबमधून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी याची माहिती दुकान मालकाला दिली. दुकान मालकाने लॅब उघडून पाहली असता लॅबमध्ये आग लागली असल्याचे निष्पण झाले. या घटणेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर घटणास्थळ गाठत पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्याचे आदेश अग्नीशमन दलाला दिलेत. तसेच या आगीमागील कारण स्पष्ट न झाल्याने या प्रकरणाची चैकशी करुन आगीमागचे कारण शोधण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे.