घुग्घूस माउंट कार्मेल कॉन्वेंट चा दहाव्या वर्गाचा सीबीएससी बोर्डाचा निकाल लागला शंभर टक्के कु.आदिति आसूटकरने पटकावला शाळेतुन प्रथम क्रमांक

246

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
नुकताच सीबीएससी बोर्डाचा निकाल सम्पूर्ण देशात जाहिर झाला .त्यामधे घुग्घूस येथील माउंट कार्मेल कान्वेंट स्कूल चा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेचे दहावी ची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी त्यात पास झाले आहेत.
घुग्घुस येथील शिक्षक नंदकिशोर असूटकर यांची कन्या कु .अदिति असूटकर हिने शाळेतुन प्रथम क्रमांक पटकावला असून तिला 94.04 टक्के गुण मिळाले आहेत. तसेच कु. आर्थिका संजय उपाध्ये हिला सुद्धा शाळेतील प्रथम येणाऱ्या दहा विद्यार्थ्यांमधे स्थान मिळाले आहे. कु. आदिति हिने आपल्या यशाचे श्रेय शाळेतिल सम्पूर्ण शिक्षक वृन्द तसेच आपल्या आई वडील यांना दिले आहे.