आत्मनिर्भर भारतासाठी ड्रॉप रोबॉल खेळ आवश्यक — खासदार डॉ. किरीट सोळंकी

121

 

दिलीप अहिनवे
मुलुंड मुंबई उपनगर प्रतिनिधी
दखल न्युज भारत
मो. 9323548658

मुंबई, दि. १६ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आत्मनिर्भर बनो” असा नारा दिला आहे. आपले पारंपरिक खेळ यासाठी गरजेचे आहेत असे प्रतिपादन अहमदाबादचे संसद सदस्य डॉ. किरीट सोळंकी यांनी केले. आॅनलाईन ड्रॉप रोबॉल वेबीनारमध्ये ते मार्गदर्शन करत होते.
भारतीयांची संस्कृती विविध खेळांनी संपन्न झालेली आहे. नवनवीन खेळ उत्साह वाढवतात. प्राचीन काळापासून उत्तर भारतात हा खेळ खेळला जात होता. कपडा व कागदापासून चेंडू तयार करत होते, अशी माहिती ड्रॉप रोबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष दत्ता गिरीगोसावी यांनी दिली. लुप्त होत असलेल्या खेळांचे आकर्षण व महत्त्व लक्षात घेऊन हरयाणाच्या ईश्वर सिंह अभ्यास करुन ड्रॉप रोबॉल खेळाची स्थापणा केली. या खेळाचा प्रचार व प्रसार जगभर होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. श्रीलंका, मलेशिया, भूतान, नेपाळ व पाकिस्तान आदी देशांमध्ये या खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. हा खेळ शिकताना अजिबात भिंती वाटत नाही. शारीरिक इजा पोहोचत नाही. नियम सरळ, साधे व सोपे आहेत असे मत भारताचे सचिव लताजी शर्मा यांनी मांडले. ग्रामीण भागातील होतकरु गरीब मुला मूलींसाठी त्यांच्यातील सुप्त गुण व आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी या स्वदेशी खेळाची गरज आहे असे मत महाराष्ट्र
ड्रॉप रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र सोनजे यांनी व्यक्त केले. हा खेळ दिवसेंदिवस खुपच लोकप्रिय होत असून थोड्याच दिवसात सर्वच देशांमध्ये खेळला जाईल असा विश्वास महाराष्ट्र सचिव दिनेश अहिरे यांनी व्यक्त केला. भारतीय पारंपरिक खेळाचा प्रचार व प्रसार करुन खेळ वाढवण्याचे प्रयत्न सर्वांनी मिळुन केले पाहिजे असे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सदाशिव बोबडे यांनी सांगितले.
या आॅनलाईन कार्यशाळेस अकबर शेख, डॉ. शिवशंकर कापसे, प्रा. डॉ. मुरलीधर राठोड, प्रा. ब्रम्हानंद मेंगडे, अंबादास गिते, महेश हरकळ, विजय संगम, सौरभ दैठणकर, रामचंद्र डुकरे व राम भुतेकर यांची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन : डॉ. किरीट सोळंकी, खासदार अहमदाबाद (गुजरात राज्य)