हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी
आरमोरी :-
शहरातील प्रभाग क्रमांक ३ येथील बाजारपेठ वार्ड मधील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचून साचून राहतो त्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना ये-जा करताना खूप त्रासाला समोर जावे लागते तसेच प्रगती चौक मधील शुभम भाऊ उईके यांच्या घरापासून ते महागु गायकवाड यांच्या घरापर्यंत रोडच्या कडेला असलेल्या विद्युत बल्ब मध्ये बिघाड झालेले असून त्याची दुरुस्ती नगर प्रशासनाने तत्काळ करावी अन्यथा युवारंग तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.