Home Breaking News अभाविप दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याकडून स्टुडंट पार्लमेंट चे आयोजन

अभाविप दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याकडून स्टुडंट पार्लमेंट चे आयोजन

140

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी :- राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक उद्देशाने देशभरात सामाजिक कार्यक्रम, आंदोलने, परिसंवाद तसेच विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम घेणारे जगातील सर्वात मोठे छात्रसंघटन अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. या संघटनेच्या कार्यपद्धतीत स्टुडन्ट पार्लमेंट या कार्यक्रमाला महत्वाचे स्थान आहे. दरवर्षी नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर या काळात देशभरात ठिकठिकाणी असे आयोजन होत असते.यावेळी सैद्धांतिक भूमिका,अभाविप कार्यपद्धती,सामाजिक सद्यस्थिती अशा अनेक विषयांवर चर्चा होते तसेच आगामी वर्षाकरीता नव्या कार्यक्रणीचीही घोषणा होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एकत्र येणे शक्य नसल्याने ऑनलाइन गुगल मीट च्या साहाय्याने ही स्टुडन्ट पार्लमेंट होणार आहे .यासाठी 9421215774 या क्रमांकावर संपर्क साधून यामध्ये दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन द.रत्नागिरी जिल्हा स्टुडन्ट पार्लमेंट कार्यक्रम प्रमुख हृषीकेश वैद्य यांनी केले आहे.
(वरील वृत्त दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यालय मंत्री सीमिन हाकीम यांनी प्रसिद्धीकरिता दिले आहे)

*दखल न्यूज भारत*

Previous articleअकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल. २६ जुलैपासून ऑनलाईन नोंदणी तर १६ जुलै पासून २४ जुलै पर्यत.. करता येणार वेबसाइटवर सराव अर्ज
Next articleहिंगणघाट नजीक के नाले के पानी मे बह जाने से चार वर्षीय बालक का करुण अंत।