अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल. २६ जुलैपासून ऑनलाईन नोंदणी तर १६ जुलै पासून २४ जुलै पर्यत.. करता येणार वेबसाइटवर सराव अर्ज

149

बाळू राऊत मुंबई उपनगर प्रतिनिधी
मुंबई : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉक डाऊन करण्यात आले होते
लॉकडाऊनमुळे तसेच मुंबईतील काही ज्युनियर कॉलेजनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन नोंदणी केली नसल्याने अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना 26 जुलैपासून ऑनलाइन नोंदणी तसेच प्रवेशअर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, संभाजीनगरात कोरोनाचा प्रादुर्भाक कायम असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रवे्शप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसारच अकराकीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आदेश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत.
विस्तृतपणे माहिती खालील वेबसाईटवर पाहण्यास मिळेल
*अकरावी प्रवेशाची वेबसाईट*
*http://mumbai.11thadmission.org.in* अर्ज भरण्याचा सराव
– विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज 26 जुलैपासूनच भरता येणार आहे. मात्र तोपर्यत विद्यार्थ्यांनी अर्ज कसा करायचा याचा सराव व्हावा यासाठी 16 जुलैपासून वेबसाईटवर सराव अर्ज भरता येणार आहे. सराव अर्जासाठी वेबसाईटवर तात्पुरती सुविधा देण्यात आली आहे. त्यात भरलेली माहिती 24 जुलैनंतर नष्ट करण्यात येईल. केवळ सरावा साठी 16 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत वेबसाईटवर Mock.Demo.Registration तपासता येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक क उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
सुधारित वेळापत्रक
– 26 जुलैपासून – अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी, प्रवेशअर्जाचा भाग एक भरणे, शाळा/ मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला अर्ज व्हेरिफाईड झाला आहे याची खात्री करणे.
– 27 जुलैपासून – प्रवेश अर्जातील माहिती तपासून व्हेरिफाय करणे (आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधणे)
– दहावीच्या ऑनलाईन निकालानंतर – विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदविणे व सबमिट / लॉक करणे (नवीन अर्ज भाग -एकसुद्धा भरता येईल).
शाळास्तरावर अर्ज ऍप्रूव्हही ऑनलाइन
शाळास्तरावर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अर्ज ऍप्रूव्ह करण्याची कार्यवाहीदेखील ऑनलाइन होणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशअर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळांनी गेल्या वर्षीचे लॉग इन आयडी वापरायचे आहेत, असे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.