वढा या तीर्थ क्षेत्रात अस्थी विसर्जनासाठी तीन लोकांना प्रवेश विठ्ठल रुख्मिणी दर्शन बंद

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
पांढरकवढा-वढा ग्रामपंचायत च्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता वढा या तीर्थ क्षेत्रात वर्धा पैनगंगा नदीच्या संगमावर अस्थी विसर्जन करण्याकरिता व विठ्ठल रुख्माईच्या दर्शना करीता भाविक भक्त मोठ्या संख्येने येत होते. यामुळे वढा-पांढरकवढा येथील ग्रामपंचायत च्या सरपंच व उपसरपंच व दोन्ही गांवातील नागरिक यांनी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता फक्त दोन ते तीनच लोकांना यापुढे तीर्थ क्षेत्री प्रवेश मिळणार असल्याचे सभेत ठरविण्यात आले. तसेच बाहेर गावावरून आलेल्या लोकांना ग्रामपंचायत येथे नोंद करावी लागेल व बाहेरील व्यक्तींना वढा येथील विठ्ठल रुख्मिणी चे मंदिर बंद असल्यामुळे दर्शन घेता येणार नाही.
वरील आदेशाचे उलंघन केल्यास कायदेशीर करवाही करण्याचे दोन्ही गावाच्या सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी ठरविले. यावेळी चर्चा करण्याकरीता पांढरकवडा ग्रामपंचायत चे सरपंच सुरज तोतडे, वढा ग्रामपंचायत चे उपसरपंच संतोष भोसकर,ईश्वर वरारकर, ज्ञानेश्वर कुंडले, पुजाराम मसे, किसन वडस्कर, आकाश पानघाटे, व वढा -पांढरकवढा या गावातील नागरिक उपस्थित होते.