चंद्रपूर जिल्हा युवा मोर्चा पदाधिकारी व मांगलगाव येथील उपसरपंच प्रफुल कोलतेला दिली,”भिसी,पोलिसांनी समज अंतर्गत तंबी… — अप्रशासकीय भाषेचा वापर करणे आले अंगलट…

0
376

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
भाजपा युवा मोर्च्याचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष व चिमूर तालुक्यातील मौजा मांगलगाव येथील उपसरपंच प्रफुल कोलते,”यांनी,भिसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधताना,अप्रशासकीय भाषेचा उपयोग केला होता.यानंतर त्यांना समजावून सांगीतले व यापुढे एका पोलिस अधिका-यां सोबत बोलत असताना अप्रशासकीय,शब्दांचा वापर करु नये.परंतू प्रफुल्ल कोलते यांनी भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभणे यांच्या समजदारपणाला,मनावर घेतले नाही.
परत दुसऱ्यांदा पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधताना,उपसरपंच प्रफुल कोलते यांनी पुन्हा अप्रशासकीय भाषेचा उपयोग केला.यानंतर पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांनी,प्रफुल्ल कोलते यांच्या अप्रशासकीय शब्दाला मनावर घेतले व त्यांना पोलिस स्टेशन भिसी येथे आणून कायदेशीर शब्दात समज दिली.आणि यापुढे अप्रशासकीय शब्दात भ्रमणध्वनी द्वारे संवाद केल्यास उचीत कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असी तंबी दिली.