बारावी परीक्षेचा विभागवार निकाल जाहीर कोकण विभाग अव्वल

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी :- लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण बोर्डाने याहीवर्षी बाजी मारली असून कोकण बोर्डाचा निकाल ९५.८९% लागला आहे.
पुणे- 92. 50टक्के,नागपूर- 91.65 टक्के, औरंगाबाद- 88.18 टक्के , मुंबई – 89.35 टक्के, कोल्हापूर- 92.42 टक्के, अमरावती- 92.09 टक्के, नाशिक- 88.87 टक्के, लातूर- 89.79 टक्के, कोकण- 95 .89 टक्के कोकण विभागच निकाल सर्वाधिक एकूण 90.66 टक्के….मागील वर्षीच्या तुलनेत 4.78 टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक निकालाची परंपरा कोकण विभागाने याहीवर्षी राखली आहे. दुपारी 1 वाजता वैयक्तिक बारावीचा निकाल पाहता येणार आहे. एक वाजता जाहीर होणारा निकाल
mahresult.nic.in या साईटवर पाहता येणार आहे.

*दखल न्यूज भारत*