Home कोरोना  ग्रामीण रूग्णालयाच्या डॉक्टरला कोरोनाची लागण,संपर्कात आलेल्या 20 लोकांना केले कॉरन्टाईन.

ग्रामीण रूग्णालयाच्या डॉक्टरला कोरोनाची लागण,संपर्कात आलेल्या 20 लोकांना केले कॉरन्टाईन.

229

 

माहूर
(प्रतिनिधी पवन कोंडे 7350807327)

ग्रामीण रूग्णालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या डॉक्टरचा स्वॅब अहवाल दि.14 जुलै रोजी पॉज़िटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 20 लोकांना कॉरन्टाईन करण्यात आले असून नगर पंचायत हद्दीतील जामा मस्जिद परिसर व कोरोना केअर सेंटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
आज दि.15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नगर पंचायतच्या सभागृहात तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांचे अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी विद्या कदम,स.पो.नि.अण्णासाहेब पवार,ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्यंकटेश भोसले,पं.स.चे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी,पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके व डॉ.अभिजीत यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत जामा मस्जिद परिसर व कोविड केअर सेंटर परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रतिबंधित क्षेत्रात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुचा सशुल्क पुरवठा नगर प्रशासन करणार असून नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी विद्या कदम यांनी केले.
कोरोना केअर सेंटर मध्ये टाकळी येथील एक युवक दि.9 जुलै पासून दोन दिवस भर्ती होता त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्या नंतर त्याला सुट्टी देण्यात आली. कोरोनाची लागण झालेले डॉक्टर केअर सेंटरला रात्र पाळीवर होते.अहवाल पॉज़िटिव्ह आल्या नंतर ते केअर सेंटर मध्ये खरेच भर्ती होते का ? हा चौकशीचा भाग आहे.कारण रात्र पाळी केल्यानंतर त्यांनी दिवसा आपल्या खाजगी रूग्णालयात अनेक रुग्णांची तपासणी केल्याच्या चर्चेला ऊत आल्याने त्याबाबीकडे प्रशासनाला गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.
कॉरंटाईन केलेल्या 20 लोकापैकी17 कोविड सेंटरचे तर 3 ग्रामीण रुग्णालयाचेच कर्मचारी असल्याची माहिती डॉ.व्यंकटेश भोसले यांनी दिली.
कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरकडे परभणी येथील पाहुणे येऊन गेल्याचीही सर्वत्र चर्चा आहे.

Previous articleविद्युत तार तुटली असल्याने शेळ्या चारणाऱ्या ठानेगाव येथील युवकाचा करंट लागुन अपघाती मृत्यु… ४ शेळ्याही दगावल्या… कुटुंबावर पसरली शोककळा…
Next articleबारावी परीक्षेचा विभागवार निकाल जाहीर कोकण विभाग अव्वल