विद्युत तार तुटली असल्याने शेळ्या चारणाऱ्या ठानेगाव येथील युवकाचा करंट लागुन अपघाती मृत्यु… ४ शेळ्याही दगावल्या… कुटुंबावर पसरली शोककळा…

671

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

आरमोरी येथुन ३ किमी अंतरावर असलेल्या मौजा ठाणेगांव येथील युवक रोजच्या नित्यनियमाप्रमाने दि.१५ जुलै २०२० रोजी सकाळी १० वाजता शेळ्या चारण्यासाठी शेळ्या घेऊन राणात गेला. सांयकाळ झाल्यानंतर उर्वरीत शेळ्या घरी आल्या पण ४ शेळ्या व शेळ्या चारणारा युवक घरी परत न आल्याने कुटुंबावर तनावाचे वातावरण निर्माण झाले. मुलगा घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोधमोहीम सुरू केली असता सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास नानाजी देवाजी नंदरधने यांच्या शेतात ४ शेळ्या मृत्यूमुखी पडलेल्या दिसल्या व नामे प्रफुल सुधाकर मेश्राम वय २२ वर्ष रा. ठानेगाव याचा विद्युत तार तुटले असल्याने करंट लागुन अपघाती मृत्यु झाले असल्याचे निदर्शनास आले. कारण तुटलेली तार त्याचे हातात होती. सदर घटणेची माहिती लगेच विद्युत वितरण विभाग व पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनी द्वारे देण्यात आली. माहिती मीळताच विद्युत विभाग व पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेऊन मोका चौकशी व पंचनामा करण्यात आला असुन पोलीस प्रशासन यांनी मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी आरमोरी येथे पाठविण्यात आला आहे. शव विच्छेदना नंतर मृतदेह अंतविधीकरीता परीवाराच्या स्वाधीन केला जाईल.

विद्युत तार कधी तुटली आणी विद्युत विज वितरण विभागाला याबाबत माहीती का नाही. हा विज वितरण विभागाचा हलगर्जीपणा निदर्शनास येत आहे. जर वेळीच तार जोडणी झाली असती कींवा विद्युत पुरवठा खंडीत केला गेला असता तर सदर युवकाचा नाहक बळी गेला नसता. असी चर्चा जनमानसात सुरु आहे. तर घरातील तरुन मुलाचा हकनाक बळी गेल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असुन परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर मृतक युवकाच्या कुटुंबाला विज वितरण विभागाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी रास्त मागणी समस्त नागरिकांनी केली आहे.