सनदी अधिकारी निला सत्यनारायण काळच्या पडद्याआड

234

बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी
मुंबई : सत्यनारायण (जन्म : मुंबई, ५ फेब्रुवारी १९४९) या १९७२च्या बॅचच्या (आता निवृत्त) सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या. याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.
नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले . .
यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं. नीला सत्यनारायण यांनी एकदा आपला अनुभव सांगताना, “लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, आयएसआय होण्यासाठीचे बळ पतीने दिले आणि त्यामुळे आयएसआय झाले,” असं सांगितलं होतं.
नीला सत्यनारायण यांची लोकप्रिय सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख तर होतीच. पण आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली होती. लेखनातून त्या नेहमी व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत होतं. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय १५० हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार करण्यात आले. याशिवाय त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं.