अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी पक्ष संघटनेकरिता कसली कंबर. सदस्य नोंदणी अभियानाला आला वेग.

132

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)

(गडचिरोली जिल्हा)

अहेरी विधानसभा क्षेत्रातील भामरागड तालुक्यात शिवसेना पक्षाचे संघटनात्मकदृष्ट्या अनेक गावात शिवसेना नवीन सदस्य नोदणी अभियान राबविण्यात येत आहे, त्या अभियानांतर्गत शिवसैनिक प्रत्येक खेड्या पाड्यातील गावांना भेटी देऊन पक्ष संगठन मजबूत करण्यासाठी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख मा. राजगोपाल सूलवावार, जिल्हा उप प्रमुख रियाज भाई शेख, उपजिल्हा प्रमुख धर्मराज रॉय, अहेरी विधानसभा प्रमुख अरुण भाऊ धूरवे सर, अहेरी विधानसभा संगाठक बिरजू भाऊ गेडाम, भामरागड ता. प्रमुख, खुशाल मडावीजी, सिरोंचा तालुका प्रमुख दुर्गेश अण्णा तोक्लाजी, उप तालुका प्रमुख दिलीप भाऊ सुरपामजी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन सदस्य नोंदणी करण्यात आली.
सदर नोंदणी अभियानादरम्यान खालील सदस्यांची नोंदणी करण्यात आली मनोज डोलू मजी विभाग प्रमुख, भामरागड, जयराम झुरू पुंगाती हितापाडी, शाखा प्रमुख श्रीकांत शुरेश मडावी, आरेवाडा शाखा प्रमुख, पदी नियुक्ती करण्यात आली व जिल्हा शिवसेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन सम्मान पूर्वक अभिनंदन करण्यात आले.